"गणाधिश"

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥


गणांचा अधिपती जो सगळ्या गुणांचा ईश्वर आहे.
जो निर्गुणांचा मुळातच आरंभ आहे आणि
जी शारदा  परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी या वाच्यांची जननी आहे तिला नमन करून 
राघवाचा पंथ मार्गक्रमण करायला सुरुवात करूया.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा